Chand Tu Nabhatla

चांद तू नभातला नि बावळा चकोर मी
गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी
चांद तू नभातला नि बावळा चकोर मी
गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी

तू चंचला, तू कामिनी, तू पद्मिनी, तू रागिणी
तना-मनात माझिया तुझी सदैव मोहिनी

उरात श्वास कोंडतो, उगा अशी नको रुसू
शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू?
उरात श्वास कोंडतो, उगा अशी नको रुसू
शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू?

तू प्रेमला, तू शामला, तू कोमला, तू दामिनी
वेंधळा जरी-तरी तुझाच चित्तचोर मी, ना

पहाट तू गं मलमली कोवळ्या उन्हातली
मधाळ गोड शिरशिरी शहारल्या मनातली
पहाट तू गं मलमली कोवळ्या उन्हातली
मधाळ गोड शिरशिरी शहारल्या मनातली

तू रोहिणी, तू मानिनी सखे तू चैत्र यामिनी
मेघ पावसाळी तू नि चिंब-चिंब मोर मी



Credits
Writer(s): Guru Thakur, Atul Kale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link