Hazar Dukhe Manaas Maajhya

सूर्य देहास जळतो आहे
मात्र मी शांत चालतो आहे
ऐकवू काय गझल मी रसिका
सारखा कंठ दाटतो आहे
हजार दुःखे मनास माझ्या

हजार दुःखे मनास माझ्या
हजार जखमा उरात माझ्या
वसंत असता सभोवताली
वसंत असता सभोवताली
ऋतू निराळाच आत माझ्या
हजार जखमा उरात माझ्या

तुझ्याविना ही जगावयाचे
जरी इथे शेकडो बहाणे
तुझ्याविना ही
तुझ्याविना ही जगावयाचे
जरी इथे शेकडो बहाणे

असे खरा रंग जीवनाचा
असे खरा रंग जीवनाचा
तुझ्यामुळे जीवनात माझ्या
हजार जखमा उरात माझ्या

समोर मृत्यू उभा तरीही
नसे तुझे वेड सोडिले मी
समोर मृत्यू उभा
समोर मृत्यू उभा तरीही
नसे तुझे वेड सोडिले मी

तुझीच गाणी अजून असती
तुझीच गाणी अजून असती
थरारणाऱ्या स्वरात माझ्या
हजार जखमा उरात माझ्या

गरीब मी दान तारकांचे
कुठून ह्या काजळीस देऊ?
गरीब मी, गरीब मी
गरीब मी दान तारकांचे
कुठून ह्या काजळीस देऊ?

उगीच खावर उभी असे ही
उगीच खावर उभी असे ही
निशा अशी अंगणात माझ्या

हजार दुःखे मनास माझ्या
हजार जखमा उरात माझ्या
वसंत असता सभोवताली
वसंत असता सभोवताली
ऋतू निराळाच आत माझ्या
हजार दुःखे मनास माझ्या



Credits
Writer(s): Bhimrao Panchale, Khaavar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link