Roop Tujh Lai Chhan Ga (From "Mala Gheun Chala")

रूप तुझं लई छान गं
माझं हरपून गेलं भान गं
Hey पोरी, रूप तुझं लई छान गं
माझं हरपून गेलं भान गं

सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा
व्हटात रंगलं पान गं

ए, करू नको गुणगान रं
माझ्या मनातलं तू रान रं
आरं, करू नको गुणगान रं
माझ्या मनातलं तू रान रं

चेहऱ्यात पोरी, तुझ्या चांदोबा हसतो
डोळ्यात नाचतंय चांदणं गं
Hey, कुरळ्या केसात वारा हा फसतो
कपाळी दिसतंय गोंधन गं

देवाचं हे वरदान गं
माझं हरपून गेलं भान गं
हा, करू नको गुणगान रं
माझ्या मनातलं तू रान रं

धरू नको रे मिठीत मजला
कुणीतरी अवचित पाहिल ना
हो, पदर बाई, माझा घामानं भिजला
तोल मनाचा जाईल ना

होऊ नको बेभान रं
माझ्या मनातलं तू रान रं
हुरर्र, रूप तुझं लई छान गं
Hey, माझं हरपून गेलं भान गं

तालावरती चाल तुझी ही
कंबर हलते झोकात गं
Hey, गालावरचा तीळ तुझा हा
उठून दिसतोय लाखात गं

करी ना जीव कुर्बान गं
Hey, माझं हरपून गेलं भान गं
आरं, करू नको गुणगान रं
माझ्या मनातलं तू रान रं

ए, सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा
व्हटात रंगलं पान गं
Hey पोरी, रूप तुझं लई छान गं
माझं हरपून गेलं भान गं

ए, करू नको गुणगान रं
माझ्या मनातलं तू रान रं



Credits
Writer(s): Dada Kondke, Ramlaxman
Lyrics powered by www.musixmatch.com

Link