Gavu Motavarch Gaan (From "Aandhala Marto Dola")

Hey, शिरपा-शिरपा हो
आलो-आलो

चल रं शिरपा, देवाची किरपा
झालीया औंदा छान रं, छान
गाऊ मोटंवरचं गाणं
गाऊ मोटंवरचं गाणं

चल माझ्या राजा, चल रं सर्जा
बिगी-बिगी, बिगी-बिगी डौलानं, डौलानं
गाऊ मोटंवरचं गाणं
गाऊ मोटंवरचं गाणं

मोटं चालली मळ्यात माझ्या
चाक वाजतंय कुईकुई, अहा
पाटाचं पाणी झुळझुळवानी
फुलवीत जातंय जाईजुई

आरं, मोटं चालली मळ्यात माझ्या
चाक वाजतंय कुईकुई
अन पाटाचं पाणी झुळझुळवानी
फुलवीत जातंय जाईजुई

धरती माता येईल आता
नेसून हिरवं लेणं रं, लेणं
गाऊ मोटंवरचं गाणं
गाऊ मोटंवरचं गाणं

सर्जा, माझ्या राजा तू रे
माझ्या सर्जा तू रे
माझ्या राजा तू रे

गाजर-मुळा नी केळी-राताळी
मागातला हरभरा (पिकलाय बरा)
पडवळ काकडी, वांगीवाल पापडी
मक्याचा डुलतोय तुरा (डुलतोय तुरा)

गाजर-मुळा नी केळी-राताळी
मागातला हरभरा
अन पडवळ काकडी, वांगीवाल पापडी
मक्याचा डुलतोय तुरा

कोथीमिर घेवडा, सुवासी केवडा
उसाचं लावलंय बेनं रं, बेनं
गाऊ मोटंवरचं गाणं
गाऊ मोटंवरचं गाणं

उसाचं पीक आलंय जोसात औंदा
(जोसात औंदा, हे-हा)
अरे, देईल बरकत मिरची न कांदा
(मिरची न कांदा, हे-हा)

आणि वाटाना भेंडी तेजीचा सौदा
(तेजीचा सौदा, हे-हा)
ए, खुशीत गातुय शेतकरी दादा
(शेतकरी दादा) बोले-बोले

गव्हाची ओंबी वाऱ्याशी झोंबी
करतीया पिरमानं, पिरमानं
गाऊ मोटंवरचं गाणं
गाऊ मोटंवरचं गाणं



Credits
Writer(s): Prabhakar Jog, Dada Kondke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link