Rumjhum Rumjhum (From "Asha Asavya Suna")

रुमझुम-रुमझुम, छुमछुम-छुमछुम
रुमझुम-रुमझुम, छुमछुम-छुमछुम
रुमझुम-रुमझुम, छुमछुम-छुमछुम

वाजती पैंजण किती, आ
वाजती पैंजण किती
रंभेसम वनदेवी नाचते
रंभेसम वनदेवी नाचते

नाही रंभा, नाही मेनका, आ
नाही रंभा, नाही मेनका
वनदेवी मी नसे

मानव कन्या रोज पूजेला येते
माझे दैवत वसते इथे
माझे दैवत वसते इथे

भाग्यवंत हा कोण असावा? आ
भाग्यवंत हा कोण असावा?
देवाचा लाडका
त्याला शोधीत मिळते येथे
रतीसम ही बालिका

रुमझुम-रुमझुम, छुमछुम-छुमछुम
रुमझुम-रुमझुम, छुमछुम-छुमछुम

दमयंती मी नळराजाची
या वनराई मध्ये भटकते
कुठे हरवला नळराजा?
मी त्याला शोधीत फिरते

माझे पाऊल वाजते इथे
माझे पाऊल वाजते इथे

धन्य-धन्य तू भारतमाते, आ
धन्य-धन्य तू भारतमाते
सती पतिव्रता नांदती येथे
सती पतिव्रता नांदती येथे

पुण्य तयांचे, कीर्ती आमची
जगात दुमदुमते
रुमझुम-रुमझुम, छुमछुम-छुमछुम



Credits
Writer(s): Nandkumar, Mama Meherkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link