Tu Havishi

स्वप्न की आभास हा, वेड लावी ह्या जीवा
वेगळी दुनिया तरीही ओळखीची

तू हवीशी, मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
भास सारे कालचे, आज ते झाले खरे
तरी का हुरहूर वाटे आपुलीशी?

तू हवीशी मला, तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी

हे नव्याने काय घडले? पाऊले रेंगाळती
तोच वाऱ्याचा शहारा, श्वास का गंधाळती?
हे नव्याने काय घडले? पाऊले रेंगाळती
तोच वाऱ्याचा शहारा, श्वास का गंधाळती?

सोबतीने चालते, भोवताली वाहते
बंध जुळले या मनाचे, त्या मनाशी

हो, तू हवीशी, मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी

पाहिले जेव्हा तुला मी, पाहताना तू मला
मी तुझी होऊन गेले, विसरले माझी मला
पहिले जेव्हा तुला मी, पाहताना तू मला
मी तुझी होऊन गेले, विसरले माझी मला

काय जादू सांग ना? हरवूनी जाता पुन्हा
कोवळेसे ऊन आले सावलीशी

तू हवीशी, मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
भास सारे कालचे, आज ते झाले खरे
तरी का हुरहूर वाटे आपुलीशी?



Credits
Writer(s): Mandar Cholkar, Nilesh Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link