Bharjari Ga Pitambar

मी शिरीष पै, आचार्य अत्रे यांची कन्या
आज आपल्या पुढं त्यांच्या चित्रपट गीतांची
ध्वनिप्रीत सादर करीत आहे
आचार्य अत्रे ह्यांच मराठी चित्रपट श्रुष्टी मधलं स्थान

हे एकमेवा द्वितीय असच म्हणावं लागेल
कारण, त्यांनी निर्माण केलेल्या "श्यामची आई"
या एकाच मराठी चित्रपटाला
राष्ट्रपतीचं पहिलं सुवर्णपदक
पटकावण्याचा मान मिळाला

भरजरी गं पीतांबर दिला फाडुन
द्रौपदीसी बंधु शोभे नारायण
सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून

बोट श्रीहरीचे कापले गं बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली
"शालु नि पैठणी फाडुन का देऊ"
"चिंधी तुम्हांसी मी?"
पाठची बहीण झाली वैरिण

द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
भरजरी गं पीतांबर दिला फाडुन
द्रौपदीसी बंधु शोभे नारायण

द्रौपदी बोलली, "हरिची मी कोण?"
परि मला त्याने मानिली बहीण
काळजाची चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण

वचने देऊन प्रभु राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज
त्रैलोक्य मोलाचे वचन दिले फाडून

द्रौपदीसी बंधु शोभे नारायण
भरजरी गं पीतांबर दिला फाडुन
द्रौपदीसी बंधु शोभे नारायण

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसी ज्याची भक्ती, तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटली पाहिजे अंतरीची खुण

धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रीतीजी करिती जगी लाभाविन
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न
द्रौपदीसी बंधु शोभे नारायण



Credits
Writer(s): Acharya Athreya, Vasant Shantaram Desai
Lyrics powered by www.musixmatch.com

Link