Hridayi Vasant Phulatana

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे?
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

मोहुनिया ऐसी जाऊ नको
रोखुनिया मजला पाहू नको
मोहुनिया ऐसी जाऊ नको
रोखुनिया मजला पाहू नको

गाणे अमोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे?

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

पाकळी-पाकळी उमले प्रीत भरलेली, हाय-होय
अवघी अवनी सजली, धुंद मोहरली
पाकळी-पाकळी उमले प्रीत भरलेली, हाय-होय
अवघी अवनी सजली, धुंद मोहरली

उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे
सौख्यात प्रेमबंधाच्या हे अंतरंग न्हावे
हळवे तरंग बहराचे ओ, अंतरी फुलावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

मदभरा प्रीतीचा गंध हा दे गं मधुवंती, हाय-हाय
रंग तू सोड रे छंद हा, तू ना मजसाठी
मदभरा प्रीतीचा गंध हा दे गं मधुवंती, हाय-हाय
रंग तू सोड रे छंद हा, तू ना मजसाठी

हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा
हे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा
जखमांत मदनबाणांच्या मन दरवळून जावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे?
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे



Credits
Writer(s): Shantaram Nandgavkar, Arun Paudwal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link