Praju - From "Time Pass 2"

किलबिलते गाणे नवे
भिरभिरते गुलाबी थवे
हाय, मी बावरू की सावरू
माझे मला ना कळे

सळसळत्या पानामध्ये
वाऱ्याच्या कानामध्ये
कुणी बोलले, मी ऐकले
वाटे मनाला हवे
प्राजू, प्राजू, प्राजू, ही प्राजू

हा छंद आहे बरा, मौजेच्या नाना तऱ्हा
स्वप्नापरी आभास का सारखा?
वेली फुलविती फुले, माडांना फुटले तुरे
लपुनी जसे करतात खाणाखुणा

फेर धरती किरणे हळू
गुणगुणते गाणे जणू
हाय मी बावरू की सावरू
माझे मला ना कळे
प्राजू, प्राजू, प्राजू, ही प्राजू

ओ, थरथरत्या पाण्यातला, लहरींच्या गाण्यातल्या
उमजेल का सूर हा नवा कोणता?
भिजण्याचा करती गुन्हा, रुजवाती येती पुन्हा
नादावला जीव हा इथे का जरा?

दरवळल्या दाही दिशा
श्वासात भिनली नशा
हाय, मी बावरू की सावरू
माझे मला ना कळे
प्राजू, प्राजू, प्राजू, हो मी प्राजू



Credits
Writer(s): Mangesh Balkrishna Kangane, Chinar Vijay Kharkar, Mahesh S Ogale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link