Yuge Atthavis

युगे २८ विठोबा विटेवरी उभा
विठोबा विटेवरी उभा
वामांगी रखुमाई विठोबा दिसे दिव्य शोभा
विठोबा दिसे दिव्य शोभा

पुंडलिकाचे भेटी विठोबा परब्रह्म आले गा
विठोबा परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा विठोबा उद्धरी जगा
विठोबा उद्धरी जगा

जय जय देवा, जय विठोबा
जय पांडुरंगा, विठोबा जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा, विठोबा राईच्या वल्लभा
विठोबा पावे जिवलगा, विठोबा पावे जिवलगा

तुळसीमाळा गळा विठोबा कर ठेऊनी कटी
विठोबा कर ठेऊनी कटी
कासे, पीतांबर विठोबा कस्तुरी लल्लाटी
विठोबा कस्तुरी लल्लाटी

देव, सुरवर विठोबा नित्य येती भेटी
विठोबा नित्य येती भेटी
गरुड, हनुमंत विठोबा पुढे उभे राहती
विठोबा पुढे उभे राहती

जय जय देवा, जय विठोबा
जय पांडुरंगा, विठोबा जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा, विठोबा राईच्या वल्लभा
विठोबा पावे जिवलगा, विठोबा पावे जिवलगा

धन्य वेणूनाद विठोबा अणुक्षेत्रपाळा
विठोबा अणुक्षेत्रपाळा
सुवर्णांची कमळे विठोबा वनमाळा गळा
विठोबा वनमाळा गळा

राई रखुमाबाई विठोबा राणीया सकळा
विठोबा राणीया सकळा
ओवाळीती राजा विठोबा, विठोबा सावळा
विठोबा, विठोबा सावळा

जय जय देवा, जय विठोबा
जय पांडुरंगा, विठोबा जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा, विठोबा राईच्या वल्लभा
विठोबा पावे जिवलगा, विठोबा पावे जिवलगा

ओवाळू आरत्या विठोबा कुरवंड्या येती
विठोबा कुरवंड्या येती
चन्द्रभागेमाजी विठोबा सोडुनियां देती
विठोबा सोडुनियां देती

दिंड्या, पताका विठोबा वैष्णव नाचती
विठोबा वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा विठोबा वर्णावा किती
विठोबा वर्णावा किती

जय जय देवा, जय विठोबा
जय पांडुरंगा, विठोबा जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा, विठोबा राईच्या वल्लभा
विठोबा पावे जिवलगा, विठोबा पावे जिवलगा

आषाढी कार्तिकी विठोबा भक्तजन येती
विठोबा भक्तजन येती
चंद्रभागेमाजी विठोबा स्नाने जे करिती
विठोबा स्नाने जे करिती

दर्शन हेळामात्रे विठोबा तया होय मुक्ति
विठोबा तया होय मुक्ति
केशवासी नामदेव विठोबा भावे ओवाळीती
विठोबा भावे ओवाळीती

जय जय देवा, जय विठोबा
जय पांडुरंगा, विठोबा जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा, विठोबा राईच्या वल्लभा
विठोबा पावे जिवलगा, विठोबा पावे जिवलगा



Credits
Writer(s): Kedar Prabhakar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link