Jhijane Tujhe He Pahun

झिजने तुझे हे पाहून लाजावे चंदना
झिजने तुझे हे पाहून लाजावे चंदना
हे रामजीच्या नंदना, तुला ही वंदना
हे रामजीच्या नंदना, तुला ही वंदना

रडत्यास पाहुनी तू त्याचे डोळे पुसावे
(तू त्याचे डोळे पुसावे)
दुःखी जणास घेऊनी तू जवळ बसावे
(तू जवळ बसावे)

पाहुनी दुखीतांना ये अश्रू लोचना
पाहुनी दुखीतांना ये अश्रू लोचना
हे रामजीच्या नंदना, तुला ही वंदना
हे रामजीच्या नंदना, तुला ही वंदना

दिन-रात फक्त खपणे हे ठावे रे तुला
(हे ठावे रे तुला)
जगता सुगंध देणे जसे ठावे रे फुला
(जसे ठावे रे फुला)

दिपकापरी जळावे तुझी हीच भावना
दिपकापरी जळावे तुझी हीच भावना
हे रामजीच्या नंदना, तुला ही वंदना
हे रामजीच्या नंदना, तुला ही वंदना

करिता दीनांची सेवा उपाशी तू राहिला
(उपाशी तू राहिला)
संसार कोटी पोशिले, घरचा ना पाहिला
(घरचा ना पाहिला)

राहो सुखात बंधू तंव ध्यास हा मना
राहो सुखात बंधू तंव ध्यास हा मना
हे रामजीच्या नंदना, तुला ही वंदना
हे रामजीच्या नंदना, तुला ही वंदना

हे चंद्र, सूर्य, तारे जोवर्ती राहतील
(जोवर्ती राहतील)
भुवरल्या तुझ्या कार्या तोवर्ती पाहतील
(तोवर्ती पाहतील)

शंकर सुतापरी किती गातील तंव गुणा
शंकर सुतापरी किती गातील तंव गुणा
हे रामजीच्या नंदना, तुला ही वंदना
हे रामजीच्या नंदना, तुला ही वंदना

झिजने तुझे हे पाहून लाजावे चंदना
झिजने तुझे हे पाहून लाजावे चंदना
हे रामजीच्या नंदना, तुला ही वंदना
हे रामजीच्या नंदना, तुला ही वंदना
हे रामजीच्या नंदना, तुला ही वंदना



Credits
Writer(s): Shankersut Aadhangale, Madhukar Redkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link