Jarasa Tu Jarashi Mee

जरासा तु, जराशी मी
हाय, जरासा तु, जराशी मी
जराशी डोळ्यात धुंद
जरासा तारा, जरासा वारा

वाऱ्यात जरासा गंध
जरासा तु, जराशी मी

जराशी निज...
जराशी निज, जराशी वीज
जराशी डोळ्यात जाग
जराशी डोळ्यात जाग

जरासा रुसे, जरासा हसे
ओठाशी लटका राग

जरासा तु, जराशी मी
जरासा तु, जराशी मी

जरासे श्वास...
जरासे श्वास, जरासे भास
भासांना, ओ, भासांना स्वप्नांचे रंग

जरासे बोल बोलात खोल
अबोध मुके तरंग

जरासा तु, जराशी मी
जरासा तु, जराशी मी

जरासे पाणी, पाण्यात गाणी
जरासे पाणी, पाण्यात गाणी
गाण्यात जराशी प्रीत

जराशी जपे, जराशी लपे
जराशी सुटते रीत

जरासा तु, जराशी मी
जरासा तु, जराशी मी

जरासे अंग, अंगात रंग
जरासे अंग, अंगात रंग
जराशी चुकते वेळेनं

जराशी भूल, जराशी हुल
जरासा जपून झेल

जरासा तु, जराशी मी
जरासा तु, जराशी मी
जराशी डोळ्यात धुंद
जरासा तारा, जरासा वारा

वाऱ्यात जरासा गंध
जरासा तु, जराशी मी



Credits
Writer(s): Shanta Shelke, Vivek Kajarekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link