Uttung Amuchi Uttar Seema

(उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू)
(उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू)
अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच-उंच चढवू
(उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू)
(उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू)

परक्यांचा येता हल्ला प्रत्येक घर बने किल्ला
(परक्यांचा येता हल्ला प्रत्येक घर बने किल्ला)
हे कोटी-कोटी भुजदंड होतील इथे ध्वजदंड
(हे कोटी-कोटी भुजदंड होतील इथे ध्वजदंड)

छातीची करु दे ढाल...
छातीची करु दे ढाल, लाल त्या संगिनीस भिडवू
(उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू)
(उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू)

बलवंत उभा हिमवंत करी हैवानांचा अंत
(बलवंत उभा हिमवंत करी हैवानांचा अंत)
हा धवलगिरी, हा नंगा, हा त्रिशूळ कांचनगंगा
(हा धवलगिरी, हा नंगा, हा त्रिशूळ कांचनगंगा)

जरी झुंड-पुंड शत्रूंची आली खिंड-खिंड अडवू
(उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू)
(उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू)

देशाचा दृढ निर्धार करु प्राणपणे प्रतिकार
(देशाचा दृढ निर्धार करु प्राणपणे प्रतिकार)
ह्या नसा-नसातील रक्त जाळील आसुरी तख्त
(ह्या नसा-नसातील रक्त जाळील आसुरी तख्त)

आम्ही न कुणाचे दास...
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू

(उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू)
(उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू)
अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच-उंच चढवू
(उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू)
(उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच-इंच लढवू)



Credits
Writer(s): Vasant Bapat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link