Shika! Sanghtit Vyah!! Sangharsh Kara!!!

संदेश बाबांचा तुम्ही ध्यानात धरा
संदेश बाबांचा तुम्ही ध्यानात धरा

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा
संघर्ष करा, संघर्ष करा
संदेश बाबांचा तुम्ही ध्यानात धरा
संदेश बाबांचा तुम्ही ध्यानात धरा

ग्रंथाविना मित्र कुणी दुसरा नसे
ज्ञान हाच जीवनाचा पाया असे

ज्ञानाधीश होवुनीया उत्कर्ष करा
उत्कर्ष करा, उत्कर्ष करा
संदेश बाबांचा तुम्ही ध्यानात धरा

वेगळे राहाल तर जाता लुबाळी
संघटनेचा अर्थ कसा, कळे ना मुळी

कशी तुमच्या वागण्याची विचित्रतः
विचित्रतः, विचित्रतः
संदेश बाबांचा तुम्ही ध्यानात धरा

तान-तान-तानल्याने राशी तुटते
घरातल्या संघर्षाने घर पेटते

हसतंया जग सारं विचार करा
विचार करा, विचार करा
संदेश बाबांचा तुम्ही ध्यानात धरा

शिकलेले हुकलेले ही गोष्ट खरी
तुमच्यापेक्षा जनता माझी अडानी बरी

भीम बाबाच्या शब्दासाठी कुंदन मरा
कुंदन मरा, कुंदन मरा
संदेश बाबांचा तुम्ही ध्यानात धरा

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा
संघर्ष करा, संघर्ष करा
संदेश बाबांचा तुम्ही ध्यानात धरा
संदेश बाबांचा तुम्ही ध्यानात धरा



Credits
Writer(s): Milind Mohite, Kundan Kamble
Lyrics powered by www.musixmatch.com

Link