Jeevala Jivaacham Daan

बंधूंनो, हजारो वर्ष जी माणसं
गुलामीच्या बंधनात बंदिस्त होती
तोंड असून ज्यांना बोलता येत नव्हतं
माणसं असून ज्यांना माणसासारखं जगता येत नव्हतं

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
आपल्या जीवाचं रान करून
त्याच माणसांना बोलायला शिकवलं
माणसासारखं वागायला शिकवलं

तीच माणसं बोलू लागली
माणसासारखी वागू लागली
ताठ मानेनं जगू लागली

जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने

जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने
जीवाला जीवाचं दान दिले भीमाने

माणसाला माणसाची साथ मुळी नव्हती
दुष्ट रूढी माणसाला छ्ळीतच होती
माणसाला माणसाची साथ मुळी नव्हती
दुष्ट रूढी माणसाला छ्ळीतच होती

समतेचा मळा फुलविला जोमाने
समतेचा मळा फुलविला जोमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने

जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने
जीवाला जीवाचं दान दिले भीमाने

विद्येचा तो doctor, शोध त्याने लाविला
माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला
विद्येचा तो doctor, शोध त्याने लाविला
माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला

माणुसकीचे बीज हे पेरिले श्रमाने
माणुसकीचे बीज हे पेरिले श्रमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने

जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने
जीवाला जीवाचं दान दिले भीमाने

गरिबाच्या घरामंदी जन्म तो घेऊनी
प्रभाकरा, कीर्ती जगी गेलाय ठेवुनी
गरिबाच्या घरामंदी जन्म तो घेऊनी
प्रभाकरा, कीर्ती जगी गेलाय ठेवुनी

शिकविली शिकवण क्रमा-क्रमाने
शिकविली शिकवण क्रमा-क्रमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने

जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने

जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने



Credits
Writer(s): Nikhil-vinay, Prabhakar Pokhrikar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link