Dhaav Aai Kulswamini

देव म्हणे "धाव आई कुलस्वामिनी"
देव म्हणे "धाव आई कुलस्वामिनी"
प्रसन्न तू हो गं आम्हा तुळजाभवानी
तुळजाभवानी, तुळजाभवानी

देव म्हणे "धाव आई कुलस्वामिनी"
देव म्हणे "धाव आई कुलस्वामिनी"

असुरानी देवतांना जेव्हा छडिले
शंभुद्वारे भवानीला सारे कळले
आराधना केली तिची साऱ्या देवांनी
साऱ्या देवांनी, साऱ्या देवांनी
देव म्हणे "धाव आई कुलस्वामिनी"

त्रास देऊ लागला गं आई तो आम्हा
नीच कर्माला त्याच्या नाही गं सीमा
"अंत नाही" म्हणे त्याचा नरा हातुनी
नरा हातुनी, नरा हातुनी
देव म्हणे "धाव आई कुलस्वामिनी"

महिषासुर वधानेच झाले सुखी गं
देवतांनी केली मग पुष्पवृष्टी गं
अंबे गेला वंदियाले मनोभावानी
मनोभावानी, मनोभावानी
देव म्हणे "धाव आई कुलस्वामिनी"

ऐसे तिने जगताला बघा तारिले
विश्वाचे सुख तिने अंगिकारले
पूजियाले माऊलीला लाखो जीवांनी
लाखो जीवांनी, लाखो जीवांनी

देव म्हणे "धाव आई कुलस्वामिनी"
प्रसन्न तू हो गं आम्हा तुळजाभवानी
तुळजाभवानी, तुळजाभवानी

देव म्हणे "धाव आई कुलस्वामिनी"
देव म्हणे "धाव आई कुलस्वामिनी"



Credits
Writer(s): Madhukar Pathak, Prakash Pawar, Milind Shinde, Eknath Maali
Lyrics powered by www.musixmatch.com

Link