Sakhe Vani Gadala Jaau

चल पुन्हा हजेरी लावू
सखे, वणी गडाला जाऊ
चल पुन्हा हजेरी लावू
सखे, वणी गडाला जाऊ

दोघं मिळून दर्शन घेऊ
सखे, वणी गडाला जाऊ
चल पुन्हा हजेरी लावू
सखे, वणी गडाला जाऊ

लग्नानंतर पुन्हा एकदा
योग हा चालुन आला
डोळे भरूनी पाहू आता गं
सप्तशृंगी मातेला

तिचा चमत्कार तो पाहू
सखे, वणी गडाला जाऊ
चल पुन्हा हजेरी लावू
सखे, वणी गडाला जाऊ

मनोकामना पूर्ण करी ती
माय माऊली अंबा
देई सावली आम्हा सुखाची
सत्वाची जगदंबा

नतमस्तक चरणी होऊ
सखे, वणी गडाला जाऊ
चल पुन्हा हजेरी लावू
सखे, वणी गडाला जाऊ

गड चढतांना सप्तशृंगीचा
उरुप येतोय मोठा
पण भक्तांच्या नको अंतरी
भक्तिभाव तो खोटा

गुणगान तिथं हे गाऊ
सखे, वणी गडाला जाऊ
चल पुन्हा हजेरी लावू
सखे, वणी गडाला जाऊ

जशी तुझी गं भक्ती मोठी
तशी मला पण गोडी
संगतीला घे ओटी भराया
इरवीत चोळी साडी

पूजा विधीच सामान घेऊ
सखे, वणी गडाला जाऊ
चल पुन्हा हजेरी लावू
सखे, वणी गडाला जाऊ

दोघं मिळून दर्शन घेऊ
सखे, वणी गडाला जाऊ
चल पुन्हा हजेरी लावू
सखे, वणी गडाला जाऊ

चल पुन्हा हजेरी लावू
सखे, वणी गडाला जाऊ
सखे, वणी गडाला जाऊ
सखे, वणी गडाला जाऊ



Credits
Writer(s): Sagar Pawar, Madhukar Pathak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link