Bhakta Sraddhene Ghei Prasad

भक्ता श्रद्धेने घेई प्रसाद
प्रभू रे कल्याणकर्ता
सरून जाईल दुःखाची रात
प्रभू रे कल्याणकर्ता

भक्ता श्रद्धेने घेई प्रसाद
(प्रभू रे कल्याणकर्ता)
सरून जाईल दुःखाची रात
(प्रभू रे कल्याणकर्ता)

जय जय लक्ष्मीरमणा, जय जय पातकहरणा
(जय जय लक्ष्मीरमणा, जय जय पातकहरणा)
भक्ता श्रद्धेने घेई प्रसाद
(प्रभू रे कल्याण करता)

सत्यनारायण तुझी श्रद्धेची भूख रे
(श्रद्धेची भूख तुझी, भक्तीची भूख रे)
सत्याच्या वाटेवरी जाई जो भक्त रे
(प्रभुजी देई त्याला प्रेमाचा हात रे)

सत्य बोला मिळेल आशिर्वाद
(प्रभू रे कल्याणकर्ता)
भक्ता श्रद्धेने घेई प्रसाद
(प्रभू रे कल्याणकर्ता)

दूध-दह्याचे पंचामृत जैसे
(निर्मल सदा तनमन असावे)
पावन मनाच्या भक्तीला भोळ्या
(तुलसीदलसम चिंतन असावे)

या प्रसादात अमृताचा स्वाद
(प्रभू रे कल्याणकर्ता)
भक्ता श्रद्धेने घेई प्रसाद
(प्रभू रे कल्याणकर्ता)

भेद ना मानी प्रभू राजा, रंक रे
(भेद ना मानी प्रभू अमीर, गरीब रे)
मनोकामना पूर्ण ईश्वर करी रे
(पूर्ण करी इच्छा, पूर्ण करी रे)

आशिर्वाद हा त्याचा प्रसाद
(प्रभू रे कल्याणकर्ता)
भक्ता श्रद्धेने घेई प्रसाद
(प्रभू रे कल्याणकर्ता)

प्रभूच्या प्रसादाचा करू नको त्याग रे
(करू नको त्याग असा, करू नको त्याग रे)
मिळेल दान हाती श्रद्धेने घ्यावे
(श्रद्धेने घ्यावे, भाव भक्तीने घ्यावे)

वर देईल प्रभूचा हात
(प्रभू रे कल्याणकर्ता)
भक्ता श्रद्धेने घेई प्रसाद
(प्रभू रे कल्याणकर्ता)

सरून जाईल दुःखाची रात
(प्रभू रे कल्याणकर्ता)

जय जय लक्ष्मीरमणा, जय जय पातकहरणा
(जय जय लक्ष्मीरमणा, जय जय पातकहरणा)
जय जय लक्ष्मीरमणा, जय जय पातकहरणा
(जय जय लक्ष्मीरमणा, जय जय पातकहरणा)

(जय जय लक्ष्मीरमणा, जय जय पातकहरणा)
(जय जय लक्ष्मीरमणा, जय जय पातकहरणा)
(जय जय लक्ष्मीरमणा, जय जय पातकहरणा)
(जय जय लक्ष्मीरमणा, जय जय पातकहरणा)
(जय जय लक्ष्मीरमणा, जय जय पातकहरणा)



Credits
Writer(s): Kirti Anurag, Jagdeesh Khebudkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link