Pune Rap

एक ते चार, सारे पसार
मग जग बुडो, नो कारभार
नो कारभार, एक ते चार
सारे पसार

वरण भातानं, तुपाच्या धारेनं, लिंबाच्या फोडीनं (ढेकर)
बायकोच्या जोडीनं, देऊन ताणून, आराम करू
सायंगकाळी मग डोलत डोलत (ओह)
उर्मट बोलत (एsss) जगाची मापं काढायला सुरू
१, २, ३, ४

आम्ही जोमात – पुणेकर
दुनिया कोमात :- पुणेकर
चपखल उत्तर पुणेकर पुणेकर
हाताचं अंतर पुणेकर पुणेकर
अकलेचा सागर पुणेकर
गोडीत जहर पुणेकर
आखीव रेखीव अती क्रिएटिव्ह पाट्यांचा कहर – पुणे

वाढीव आमचे पुणे
इथे होतात पाच बे दुणे
आम्हीच केवळ दर्जा आणि बाकी सारे खारे दाणे
सा-यांना घराणे
इथे सारे दीड शहाणे
आमच्यापुढे नाही कुणी कोणे रे तिकडे कोणे कोणे

धोतरवाले पगडीवाले आम्ही पुणेरी
एस पी मॉडर्न एफ़ सी वाले आम्ही पुणेरी
स्कार्फ़ बांधून रायडर मुली आम्ही पुणेरी हे
शुध स्वच्छ स्पष्ट आमची बोली आम्ही पुणेरी

पर्वा भेटायला एक जण आला आणि मला म्हणाला
काहून तू पुने पुने पुणे पुणे करुन राय्ला बे
पुण्यन जगाले का दिले बे... नाई काच दिले बे
ना संत्री दिली ना मंत्री दिली ना हल्दीराम ना बर्फी दिली
पुण्यन जगाले का दिले बे " भैताडा "

काहून तू पुने पुने पुणे पुणे करुन राय्ला बे
मी म्हटलं लेका
एकदा बोललात पुन्हा बोलू नका
इथे भेटलात तिथे भेटू नका
पुण्याने जगाला काय काय दिलंय ऐकायचंय
ऐका

छोटे छोटे रस्ते दिले, गल्ल्या दिल्या बोळ दिले
२४ तास गर्दी दिली, ट्रॅफिकवाले घोळ दिले
मोठे मोठे सण दिले, त्याहून मोठे मन दिले
पावलोपावली मांडव दिले, माणसागणिक तांडव दिले
५५० पेठा, वनवेमधल्या खेटा

लक्ष्मी रोड, तुळशीबाग, रमणबाग, सारसबाग
जागोजागी कार्यक्रम, उत्सवांनी आणली जाग
वाक्यागणिक ज्ञान, सारेच अक्कलवान
मोठे मोठे मॉल, एसी वीना हॉल
स्वारगेट, पुलगेट, पेरुगेट

कपाळावर आठी स्माईल कोलगेट
न च्या जागी न ण च्या जागी ण
एम् आणि यम वेगळे करून दिले
सानुनासिक टिंबवाल्या उच्चारांचा खच दिला
गायक दिले वादक दिले डान्सर दिले ऍक्टर दिले
साध्यासुध्या इंडस्ट्रीला आम्ही एक्स फॅक्टर दिले

एवढे दिले तरी म्हणे काय दिले बे
चला या आता

वाढीव आमचे पुणे
इथे होतात पाच बे दुणे
आम्हीच केवळ दर्जा आणि बाकी सारे खारे दाणे
श्रीमंत गणपती, भिकारदास मारुती
देवांनाही सोडवत नाही जगात भारी आमचे पुणे

धोतरवाले पगडीवाले आम्ही पुणेर
एस पी मॉडर्न एफ़ सी वाले पक्के पुणेरी
स्कार्फ़ बांधलेल्या रायडर मुली आम्ही पुणेरी
शुध स्वच्छ स्पष्ट आमची बोली आम्ही पुणेरी



Credits
Writer(s): Hrishikesh, Jasraj, Saurabh, Vaibhav Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link