Vate Vari

वाटेवरी काटे जरी चालायचे
कोडे भरकटलेले, धागे गुरफटलेले जोडायचे

हो, आनंदी अश्रूंची चव चाखूया
सतरंगी स्वप्नांनी जग जिंकूया
आनंदी अश्रूंची चव चाखूया
सतरंगी स्वप्नांनी जग जिंकूया

शोधुया पुन्हा चुकलेल्या खुणा
झुकल्या पापण्या उघडाव्या
खुलताना कळ्या होती मोकळ्या
मिटल्या पाकळ्या उमलाव्या
पसरले किरण हे आशांचे, विसर अंधार हा
गवसले सूर ही भासांमधले स्पर्श होता नवा
हो, उलगडणारा बंध नात्यातला
गहिवरणारा हात हातातला

वाटेवरी काटे जरी चालायचे
कोडे भरकटलेले, धागे गुरफटलेले जोडायचे

हो, आनंदी अश्रूंची चव चाखूया
सतरंगी स्वप्नांनी जग जिंकूया
आनंदी अश्रूंची चव चाखूया
सतरंगी स्वप्नांनी जग जिंकूया

शोधुया पुन्हा चुकलेल्या खुणा
झुकल्या पापण्या उघडाव्या
खुलताना कळ्या होती मोकळ्या
मिटल्या पाकळ्या उमलाव्या



Credits
Writer(s): Mandar Cholkar, Prafule Karlekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link