Buddhachi Vaani

मंगलमयक्षणी धम्माची गाणी...
मंगलमयक्षणी धम्माची गाणी पडावी सर्वांच्या कानी, हो
गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी
(गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी)

जन्म ज्याला, मृत्यू त्याला नाही यात शंका
माझे-माझे म्हणून का मानव पिटीत राहतो डंका?

क्षणभंगुर या जीवनी कशाला...
क्षणभंगुर या जीवनी कशाला अभिमान तो मानी? हो
गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी
(गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी)

पर स्त्री माता, पर स्त्री बहीण, पर धन नाही आपले
तथागतानी निवांत ठाई मनोमनी जप जपले

स्वतः तरुणी प्रेमाने चारा...
स्वतः तरुणी प्रेमाने चारा पशु आणि तो प्राणी, हो
गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी
(गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी)

दोन दिवसाची किमया मोठी, घडती गाठी-भेटी
प्रसंग येता बघा शेवटी कोण थांबे कोणासाठी

मानव जन्म एकदाच रे...
मानव जन्म एकदाच रे, नाही कुणाचा कोणी, हो
गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी
(गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी)

दया, क्षमा अन् शांती असावी, नसावं नुस्तं युद्ध
वाचा शुद्ध, काया शुद्ध, नीती असावी शुद्ध

काले नंदा अमृत झाले...
काले नंदा अमृत झाले रोहिणी नदीचे पाणी, हो
गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी
(गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी)

मंगलमयक्षणी धम्माची गाणी...
मंगलमयक्षणी धम्माची गाणी पडावी सर्वांच्या कानी, हो
गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी
(गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी)

(गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी)

Credits
Writer(s): Harshad Shinde, Kalenand Kuvefalkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link