Maagu Kasa Mi (From "Bhikari")

मागू कसा मी? अन मागू कुणा?
माझी व्यथा ही समजावू कुणा?

हो, मागू कसा मी? अन मागू कुणा?
माझी व्यथा ही समजावू कुणा?
आहे उभा बघ दारी तुझ्या
जाणून घेरे जरा याचना

देशील का कधी झोळीत ह्या?
तू दान माझे मला जीवना
मागू कसा मी? अन मागू कुणा?

झोळी रीती आहे जरी
आशा खुळी माझ्या उरी

झोळी रीती आहे जरी
आशा खुळी माझ्या उरी

आर्त का हो ह्या मनाचा आहे खरा?
घाम हो या काळजाला, दावू कुणा?
मागू कसा मी? अन मागू कुणा?

शोधू कुठे माया तिची?
तिचा लळा, छाया तिची

शोधू कुठे माया तिची?
तिचा लळा, छाया तिची

मी भिकारी जीवनी या आईविना
सोसवेना वेदना सांगू कुणा?
मागू कसा मी? अन मागू कुणा?
माझी व्यथा ही समजावू कुणा?



Credits
Writer(s): Guru Thakur, Vishal Mishra
Lyrics powered by www.musixmatch.com

Link