Gandha Ajunahi

या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही
पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही
या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही
पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही
शिंपडलेल्या अंगणामध्ये अजून बारीक ठसे
घर भरलेल्या हाकांनी मधून लागे पिसे
भिंतींना या जुन्या खडुचा रंग अजूनही
पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही
कशी पुसावी दिवसांवरली जुनी जुनीशी धुळ
पांघरतो मग रोज नव्याने हवीहवीशी झुल
हुंदक्यात या दाटून येते
हुंदक्यात या दाटून येते खंत अजूनही
पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही



Credits
Writer(s): Gandhaar Gandhaar, Kshitij Patwardhan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link