Vel Hi Nirali

वेळ ही निराळी, येऊनी सांज वेळी
मित्रांची मैफिल ही, अनोखी ही टोळी
सौम्य ह्या प्रकाशी संवाद होई नभाशी
साक्षीदार तारेही चमचमती आकाशी

वेळ ही निराळी, येऊनी सांज वेळी
मित्रांची मैफिल ही, अनोखी ही टोळी
सौम्य ह्या प्रकाशी संवाद होई नभाशी
साक्षीदार तारेही चमचमती आकाशी

मस्तीची शाळाही रोज अशी भरायची
कट्यावरच्या गप्पांवर हार-जीत ठरायची
चहाच्या टपरीवर रंगत खरी ती होती
आज ही, तर ती उद्या, रोज गोडी आवडायची

आठवणींची कोरी पाटी
आज नव्याने गिरवली होती
भेट अधुरी राहिली होती
ती फक्त एका मित्राची

संवेदना कोणतीही कुणा ना कळायची
जगण्याची खरी मजा जी त्या दिवसात मिळायची
आठवणींच्या क्षणांनी ही जिंदगी भरावी
खंत ना कुठलीही या मनाशी उरावी



Credits
Writer(s): Vipul Narednra Shivalkar, Keval Jaywant Walanj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link