Nana Pariche Kasht Soshile

ना-ना परीचे कष्ट सोशिले...
ना-ना परीचे कष्ट सोशिले जाऊनी संतांघरी
कुठे रे शोधू तुजला हरी?
कुठे रे शोधू तुजला हरी?

(कुठे रे शोधू तुजला हरी?)
(कुठे रे शोधू तुजला हरी?)

भक्तिरसाची घागर जेथे
म्हणती सापडतोशी तेथे
भक्तिरसाची घागर जेथे
म्हणती सापडतोशी तेथे

तंव चरणी मी मस्तक ठेवून...
तंव चरणी मी मस्तक ठेवून पूजीन तुज अंतरी
कुठे रे शोधू तुजला हरी?
(कुठे रे शोधू तुजला हरी?)
(कुठे रे शोधू तुजला हरी?)

घेऊनी हाती भावफुले मी
धाव घेतली तंव चरणी मी
घेऊनी हाती भावफुले मी
धाव घेतली तंव चरणी मी

छेडूनी वीणा तुज आळवितो...
छेडूनी वीणा तुज आळवितो येऊनी तंव मंदिरी
कुठे रे शोधू तुजला हरी?
(कुठे रे शोधू तुजला हरी?)
(कुठे रे शोधू तुजला हरी?)

अमृताहुनी गोड खरोखर
नाम तुझे ते रोज मुखावर
अमृताहुनी गोड खरोखर
नाम तुझे ते रोज मुखावर

देवघरामधे भजन मी करितो...
देवघरामधे भजन मी करितो घेऊनी चिपळ्या करी
कुठे रे शोधू तुजला हरी?
(कुठे रे शोधू तुजला हरी?)
(कुठे रे शोधू तुजला हरी?)

येऊनी जन्मा जे-जे केले
अंतर त्याने तुजला दिसले
येऊनी जन्मा जे-जे केले
अंतर त्याने तुजला दिसले

अज्ञानी या दत्तात्रयाला...
अज्ञानी या दत्तात्रयाला तूच प्रभू उद्धरी
कुठे रे शोधू तुजला हरी?
(कुठे रे शोधू तुजला हरी?)
(कुठे रे शोधू तुजला हरी?)

ना-ना परीचे कष्ट सोशिले...
ना-ना परीचे कष्ट सोशिले जाऊनी संतांघरी
कुठे रे शोधू तुजला हरी?
कुठे रे शोधू तुजला हरी?

(कुठे रे शोधू तुजला हरी?)
(कुठे रे शोधू तुजला हरी?)



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, Datta Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link