Roz Sakaali Mangal Veli

रोज सकाळी मंगळवेळी
दत्तगुरुंचे ध्यान करा
दत्तगुरुंचे ध्यान करा

दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)

ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर
त्रैमूर्ती अवतार मनोहर
ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर
त्रैमूर्ती अवतार मनोहर

दैवत आपुले दत्त दिगंबर
दैवत आपुले दत्त दिगंबर
स्मरा-स्मरा विश्वंभरा
स्मरा-स्मरा विश्वंभरा

(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)

विश्वाचा तो विश्वविधाता
दत्तगुरु हो आमचा त्राता
विश्वाचा तो विश्वविधाता
दत्तगुरु हो आमचा त्राता

चरणी त्यांच्या विनम्र होऊनी
चरणी त्यांच्या विनम्र होऊनी
सदैव त्यांची पूजा करा
सदैव त्यांची पूजा करा

(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)

भक्ती करावी गुरुदत्ताची
मार्ग मुक्तीचा दावील तोचि
भक्ती करावी गुरुदत्ताची
मार्ग मुक्तीचा दावील तोचि

ध्यान लावूनी अंतरी पाही
ध्यान लावूनी अंतरी पाही
दत्तात्रय त्या ईश्वरा
दत्तात्रय त्या ईश्वरा

(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)

दत्तगुरुंचे चरण धरावे
नामी त्यांच्या रमुनी जावे
दत्तगुरुंचे चरण धरावे
नामी त्यांच्या रमुनी जावे

भक्तिभावे त्या आळवावे
भक्तिभावे त्या आळवावे
भजा-भजा हो गुरुवरा
भजा-भजा हो गुरुवरा

(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)

रोज सकाळी मंगळवेळी
दत्तगुरुंचे ध्यान करा
दत्तगुरुंचे ध्यान करा

दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)

(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)

Credits
Writer(s): Vitthal Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link