Navara Majhya Muthit Ga

जीव जीवाला मिळे
तुला अन मला कळे
केले दोघांच्या बळे
आता माझा जीव जळे

फिरले ठायी-ठायी
सख्या रे, तुझ्याच पायी
आणि जीवाची झाली अलाही
आता निरखून पाही

म्हणून मी तर खाऊन-पिऊन, आ
म्हणून मी तर खाऊन-पिऊन
झाले अशी गुटगुटीत गं

ए, अगं, हा नवरा माझ्या मुठीत गं, बाई
नवरा माझ्या मुठीत गं
नवरा माझ्या मुठीत गं, बाई
नवरा माझ्या मुठीत गं

सोंग दुखण्याचं आणुनी
मी देते पलंगावर ताणुनी
हे खरं सारं माणुनी
पतीचं कर्तव्य जाणुनी

बाजार आणतोय रामावानी
बाजार आणतो
ए, बाजार आणतोय रामावानी
बसतोय मसाला कुटीत गं

ए, नवरा माझ्या मुठीत गं, बाई
नवरा माझ्या मुठीत गं
नवरा माझ्या मुठीत गं, बाई
नवरा माझ्या मुठीत गं

रोज सकाळी उठतोय आणि, आ
रोज सकाळी उठतोय आणि
आंघोळीला ठेवतोय पाणी
मग हळूच लागतोय गाणी

मला म्हणतोय, "उठा की राणी"
मला म्हणतोय, "उठा की राणी"

माझ्यावरती करतोय कीर्ती
माझ्यावरती करतोय कीर्ती
बसतोय चपात्या लाटीत

ए, नवरा माझ्या मुठीत गं, बाई
नवरा माझ्या मुठीत गं
नवरा माझ्या मुठीत गं, बाई
नवरा माझ्या मुठीत गं

असा भोळा हा पतीराज
शीळ खाई, मला देई ताजं
ए, बाई, सांगायची वाटते लाज
रात्री हात-पाय दाबतोय माझं

अगं, दया मला येते
ए, दया मला येते अन जवळ मी घेते
दया मला येते, जवळ मी घेते
तंवा बसतोय आनंद लुटीत गं

ए, नवरा माझ्या मुठीत गं, बाई
नवरा माझ्या मुठीत गं
नवरा माझ्या मुठीत गं, बाई
नवरा माझ्या मुठीत गं

म्हणून मी तर खाऊन-पिऊन
म्हणून मी तर खाऊन-पिऊन
झाले अशी गुटगुटीत गं

नवरा माझ्या मुठीत गं, बाई
नवरा माझ्या मुठीत गं
नवरा माझ्या मुठीत गं, बाई
नवरा माझ्या मुठीत गं

नवरा माझ्या मुठीत गं, बाई
नवरा माझ्या मुठीत गं



Credits
Writer(s): Anand, Vitthal Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link