Aayushya He Gadiche Khare Udyache

आयुष्य हे घडीचे सर्वांना जावयाचे
पर्वाचे काय ठावे नाही खरे उद्याचे
आयुष्य हे घडीचे सर्वांना जावयाचे
पर्वाचे काय ठावे नाही खरे उद्याचे
आयुष्य हे घडीचे...

सजवून ठेवलेली नश्वर ही आहे काया
अंगास अत्तराचा तू लाविलास फाया
सजवून ठेवलेली नश्वर ही आहे काया
अंगास अत्तराचा तू लाविलास फाया

कायेची राख होते तू भान ठेव याचे
पर्वाचे काय ठावे नाही खरे उद्याचे
आयुष्य हे घडीचे सर्वांना जावयाचे
पर्वाचे काय ठावे नाही खरे उद्याचे
आयुष्य हे घडीचे...

मन आरश्यात हरीची छवी राहू दे सदा ही
करुनी पुण्य-कर्म पुण्याची कर कमाई
मन आरश्यात हरीची छवी राहू दे सदा ही
करुनी पुण्य-कर्म पुण्याची कर कमाई

तो दानधर्म देईल दर्शन ईश्वराचे
पर्वाचे काय ठावे नाही खरे उद्याचे
आयुष्य हे घडीचे सर्वांना जावयाचे
पर्वाचे काय ठावे नाही खरे उद्याचे
आयुष्य हे घडीचे...

कोणी न साथ देईल, येईल वेळ जेव्हा
कर्माचा सर्व तेथे होईल हिशेब तेव्हा
कोणी न साथ देईल, येईल वेळ जेव्हा
कर्माचा सर्व तेथे होईल हिशेब तेव्हा

अजूनीही वेळ आहे, हरिनाम घेई वाचे
पर्वाचे काय ठावे नाही खरे उद्याचे
आयुष्य हे घडीचे सर्वांना जावयाचे
पर्वाचे काय ठावे नाही खरे उद्याचे
आयुष्य हे घडीचे...

कोणी नसे तुझे रे करतोस माझे-माझे
घरी-दारी संसाराचे वाहतोस तूच ओझे
कोणी नसे तुझे रे करतोस माझे-माझे
घरी-दारी संसाराचे वाहतोस तूच ओझे

उगवेल सूर्य जेव्हा गुणगान गा हरीचे
पर्वाचे काय ठावे नाही खरे उद्याचे
आयुष्य हे घडीचे सर्वांना जावयाचे
पर्वाचे काय ठावे नाही खरे उद्याचे

आयुष्य हे घडीचे सर्वांना जावयाचे
पर्वाचे काय ठावे नाही खरे उद्याचे
आयुष्य हे घडीचे...



Credits
Writer(s): Bhushan Dua, Harender Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link