Taal Bole Chipalia

टाळ बोले चिपळीला, "नाच माझ्यासंग"
टाळ बोले चिपळीला, "नाच माझ्यासंग"
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

दरबारी आले रंक आणि राव
दरबारी आले रंक आणि राव
सारे एकरूप, नाही भेदभाव
सारे एकरूप, नाही भेदभाव

गाऊ-नाचू सारे, हो
गाऊ-नाचू सारे होऊनी निःसंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

(टाळ बोले चिपळीला, "नाच माझ्यासंग")
(टाळ बोले चिपळीला, "नाच माझ्यासंग")
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

जनसेवेपायी काया झिजवावी, काया

जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी

ताल देऊनी हा...
ताल देऊनी हा बोलतो मृदंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

(टाळ बोले चिपळीला, "नाच माझ्यासंग")
(टाळ बोले चिपळीला, "नाच माझ्यासंग")
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

ब्रम्हानंदी देह बुडूनिया जाई
ब्रम्हानंदी देह बुडूनिया जाई
एक-एक खांब वारकरी होई
एक-एक खांब वारकरी होई

कैलासाचा नाथ...
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

(टाळ बोले चिपळीला, "नाच माझ्यासंग")
(टाळ बोले चिपळीला, "नाच माझ्यासंग")
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link