Mi Varyachya Vegane Aale

मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतीने धुंद झाले, वसंतातले रंग ल्याले
मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतीने धुंद झाले, वसंतातले रंग ल्याले

अश्या रेशमी सांजवेळी
तुझे गीत झंकारताना सूर प्याले
मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतीने धुंद झाले, वसंतातले रंग ल्याले

अश्या रेशमी सांजवेळी
तुझे गीत झंकारताना सूर प्याले
मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतीने धुंद झाले, वसंतातले रंग ल्याले

बेहोश वेळी अश्या गाण्यात आली नशा
बेहोश वेळी अश्या गाण्यात आली नशा
आनंद ओसंडताना बेधुंद झाल्या दिशा

बेहोश वेळी अश्या गाण्यात आली नशा
आनंद ओसंडताना बेधुंद झाल्या दिशा

कुठे पान नादात हाली
तसे फूल लाजून बोली
तुझी पाकळी मीच झाले

अश्या रेशमी सांजवेळी
तुझे गीत झंकारताना सूर प्याले
मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतीने धुंद झाले, वसंतातले रंग ल्याले

आभाळ गंधाळताना, दो जीव स्वप्नाळताना
आभाळ गंधाळताना, दो जीव स्वप्नाळताना
श्वासातही कैफ आला हे चांदणे सांडताना

आभाळ गंधाळताना, दो जीव स्वप्नाळताना
श्वासातही कैफ आला हे चांदणे सांडताना

तुझा स्पर्श होताच गाली
मनी मलमली हालचाली
क्षणी चंद्र गंधात न्हाले

अश्या रेशमी सांजवेळी
तुझे गीत झंकारताना सूर प्याले
मी वाऱ्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतीने धुंद झाले, वसंतातले रंग ल्याले
वसंतातले रंग ल्याले, वसंतातले रंग ल्याले



Credits
Writer(s): Arun Paudwal, Santaram Nandgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link