Shodhito Radhela Shreehari

शारद पुनवा, शांत चांदणे कालिंदीच्या तटी
गोपी जमल्या, रास रंगला कदंब तरूतळवटी

दिसे ना सखी, लाडकी परी
दिसे ना सखी, लाडकी परी
शोधितो राधेला श्रीहरी
शोधितो राधेला श्रीहरी

दिसे ना सखी, लाडकी परी
शोधितो राधेला श्रीहरी
शोधितो राधेला श्रीहरी

इथे पाहतो, तिथे पाहतो
मध्येच थबकुन उभा राहतो
हो, इथे पाहतो, तिथे पाहतो
मध्येच थबकुन उभा राहतो

बासरी मुकीच ओठांवरी
बासरी मुकीच ओठांवरी
शोधितो राधेला श्रीहरी
शोधितो राधेला श्रीहरी

दरवळलेल्या कुंजानिकटी
इथेच ठरल्या होत्या भेटी
दरवळलेल्या कुंजानिकटी
इथेच ठरल्या होत्या भेटी

कशी ती वेळा टळली तरी
हा, कशी ती वेळा टळली तरी
शोधितो राधेला श्रीहरी
शोधितो राधेला श्रीहरी

हो, गोपाळा कृष्ण, राधा कृष्ण
गोपाळा कृष्ण, राधा कृष्ण

काय वाजले प्रिय ते पाऊल
तो तर वारा तिची न चाहूल
हो, काय वाजले प्रिय ते पाऊल
तो तर वारा तिची न चाहूल

भास हो फसवा वरचेवरी
भास हो फसवा वरचेवरी
शोधितो राधेला श्रीहरी
शोधितो राधेला श्रीहरी

दिसे ना सखी, लाडकी परी
शोधितो राधेला श्रीहरी
शोधितो राधेला श्रीहरी

हो, गोपाळा कृष्ण, राधा कृष्ण
गोपाळा कृष्ण, राधा कृष्ण
गोपाळा कृष्ण, राधा कृष्ण
गोपाळा कृष्ण, राधा कृष्ण



Credits
Writer(s): Ashok Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link