Dhund Ekant Ha

धुंद एकांत हा प्रीत आकारली
सहज मी छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा...

जाण नाही मला प्रीत आकारली
सहज तु छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा...

गंधवेडी कुणी, लाजरी-बावरी
चांदणे शिंपिते चैत्रवेली तरी
यौवनाने तिला आज शृंगारली
सहज मी छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा...

गोड संवेदना अंतरी या उठे
गोड संवेदना अंतरी या उठे
फूल होता कळी, पाकळी ही मिटे

लोचनी, चिंतनी मूर्त साकारली
सहज मी छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा...

रोम-रोमांतुनी गीत मी गाईले
दाट होता धुके स्वप्न मी पाहिले
पाहता-पाहता रात्र मंथारली

आज बाहुत या लाज आधारली
सहज तु छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा...



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link