Shri Ramache Charan Dharave

श्रीरामाचे चरण धरावे
श्रीरामाचे चरण धरावे
दर्शनमात्रे पावन व्हावे
दर्शनमात्रे पावन व्हावे
श्रीरामाचे चरण धरावे

सती अहिल्या दगडामाजी
शापित होऊन युग-युग मोजी
सती अहिल्या दगडामाजी
शापित होऊन युग-युग मोजी

जरी प्रभूच्या पदस्पर्शाने
पाषाणासही जीवन द्यावे
पाषाणासही जीवन द्यावे
श्रीरामाचे चरण धरावे
श्रीरामाचे चरण धरावे
उष्टी बोरे अर्पुन प्रभुला
शबरीने जणू ठाव पाहिला
उष्टी बोरे अर्पुन प्रभुला
शबरीने जणू ठाव पाहिला

स्वीकारुन ती रघुरायाने
देवपणाचे बीरुद ल्यावे
देवपणाचे बीरुद ल्यावे
श्रीरामाचे चरण धरावे
श्रीरामाचे चरण धरावे

वनवासातच जीवन सरले
वनवासातच जीवन सरले
रामायणही तिथेच घडले
रामायणही तिथेच घडले

अयोध्येस प्रभू परतुन येता
प्रेमाश्रूंनी नगर भिजावे
प्रेमाश्रूंनी नगर भिजावे
श्रीरामाचे चरण धरावे
श्रीरामाचे चरण धरावे



Credits
Writer(s): Yashwant Deo
Lyrics powered by www.musixmatch.com

Link