Nako Chhedoo Nako Pava

मी रे गवळ्याची राधा
तुझ्या मुरलीच्या नादा

मज होते बाधा, भुलते मुकुंदा
नको-नको छेडू नको पावा
नको-नको छेडू नको पावा

मुरलीचे मंजुळ सूर...
मुरलीचे मंजुळ सूर पडतासी कानी
बावरते, मोहना, मी जशी हरणी

ओढ मनी लागते, वेड्यापरी वागते
तुझा इशारा कान्हा मज ठावा

मज होते बाधा, भुलते मुकुंदा
नको-नको छेडू नको पावा
नको-नको छेडू नको पावा

झाली फजिती माझी काल दुपारी, बाई
झाली फजिती माझी काल दुपारी
होती घरी सासू आणि माडीवरी स्वारी

तरी पाश तोडुनी, आले काम सोडुनी
घडी-घडी लवतो बाई, डोळा डावा

मज होते बाधा, भुलते मुकुंदा
नको-नको छेडू नको पावा
नको-नको छेडू नको पावा

करुनी बहाणा मी तुझ्यासाठी, संजया
करुनी बहाणा मी तुझ्यासाठी, संजया
येईन रे कळपाखाली तुला रिझवाया

परंतु नको अशी भूल पाडू म्हशी
पुरे बाई, आता हा तुझा कावा

मज होते बाधा, भुलते मुकुंदा
नको-नको छेडू नको पावा
नको-नको छेडू नको पावा
नको-नको छेडू नको पावा
नको-नको छेडू नको पावा



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link