Malmali Tarunya Maaze

मलमली तारुण्य माझे
मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे
मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे

मोकळ्या केसांत माझ्या
मोकळ्या केसांत माझ्या
तू जिवाला गुंतवावे
मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे

लागुनी थंडी गुलाबी, हॅं
लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी
लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी की
राजसा, राजसा माझ्यात तू अन
मी तुझ्यामाजी भिनावे

मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे
हो, मोकळ्या केसांत माझ्या
तू जिवाला गुंतवावे
मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे

कापऱ्या माझ्या तनूची तार झंकारून जावी
कापऱ्या माझ्या तनूची तार झंकारून जावी
रेशमी, रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे

मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे
हो, मोकळ्या केसांत माझ्या
तू जिवाला गुंतवावे
मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे

रे तुला बाहूत माझ्या
रे तुला बाहूत माझ्या
रूपगंधा जाग यावी
रे तुला बाहूत माझ्या
रूपगंधा जाग यावी

मी तुला...
मी तुला जागे करावे
मी तुला जागे करावे
तू मला बिलगून जावे

मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे
हो, मोकळ्या केसांत माझ्या
तू जिवाला गुंतवावे
मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे



Credits
Writer(s): Chitalkar Ramchandra, Suresh Bhat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link