Ajab Sohala Mati Bhidali Abhala

अजब सोहळा, अजब सोहळा
माती भिडली आभाळा

मुकी मायबाई, तिला राग नाही
मुकी मायबाई, तिला राग नाही

तुडवून पायी तिचा केला चोळा-मोळा
अजब सोहळा, अजब सोहळा
माती भिडली आभाळा

किती काळ साहील? किती मूक राहील?
किती काळ साहील? किती मूक राहील?

वादळली माती करी वाऱ्याचा हिंदोळा
अजब सोहळा, अजब सोहळा
माती भिडली आभाळा

कुणी पाय देता चढे धूळ माथा
कुणी पाय देता चढे धूळ माथा

माणसा रे, आता बघ उघडून डोळा
अजब सोहळा, अजब सोहळा
माती भिडली आभाळा
अजब सोहळा, अजब सोहळा
माती भिडली आभाळा



Credits
Writer(s): Shanta Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link