Barister Saheb Maajh

वदे रमाई, साजने बाई
काय सांगू मी ती नवलाई?
मन गहिरवलं, फुलून बहरलं
मन गहिरवलं, फुलून बहरलं

पतुर आलय आज
येणार बाई Barister साहेब माझ
(येणार बाई Barister साहेब माझ)

गुणी-गुणांचा राजा दीनांचा
गुणी-गुणांचा राजा दीनांचा
थाटण्या संसार साज
येणार बाई Barister साहेब माझ
(येणार बाई Barister साहेब माझ)

गोड-गोड ही कानी पडली सुमधुर गं वाणी
(सुमधुर गं वाणी)
धन्य झाले मी ऐकून सार त्या राजाची राणी
(त्या राजाची राणी)
गोड-गोड ही कानी पडली सुमधुर गं वाणी

धन्य झाले मी ऐकून सार त्या राजाची राणी
साकार झाल फळाला आलं, साकार झाल फळाला
आल सपान वैभव ताज
येणार बाई Barister साहेब माझ
(येणार बाई Barister साहेब माझ)

दुबळ्या संसारात माझ्या पिले कोट्यानुकोटी
(पिले कोट्यानुकोटी)
त्या बाळांना गोंजाराया समर्थ माझी ओटी
(समर्थ माझी ओटी)

दुबळ्या संसारात माझ्या पिले कोट्यानुकोटी
त्या बाळांना गोंजाराया समर्थ माझी ओटी
मनी गं स्पुर्ती पाहून कीर्ती, मनी गं स्पुर्ती पाहून कीर्ती
मन हे मनात लाज
येणार बाई Barister साहेब माझ
(येणार बाई Barister साहेब माझ)

आई अशी मी कोटी दीनांची नशीब माझ थोर गं
(नशीब माझ थोर गं)
या घरट्यात पाजीन त्यांना ही मायेची धार गं
(ही मायेची धार गं)
आई अशी मी कोटी दीनांची नशीब माझ थोर गं
या घरट्यात पाजीन त्यांना ही मायेची धार गं

दुःखितांच, शोषितांच, दुःखितांच, शोषितांच
शिरी वाहण्या ओझं
येणार बाई Barister साहेब माझ
(येणार बाई Barister साहेब माझ)

कुंकू भाळी हे भाग्याच झाल आज धनवान
(झाल आज धनवान)
गळी पोत ही काळ्या मण्याची भासे मौल्यवान
(भासे मौल्यवान)

कुंकू भाळी हे भाग्याच झाल आज धनवान
गळी पोत ही काळ्या मण्याची भासे मौल्यवान
सांगू कस गं? वाट अस गं
सांगू कस गं? वाट अस गं हर्षदा दिलराज

येणार बाई Barister साहेब माझ
(येणार बाई Barister साहेब माझ)

गुणी गुणांचा राजा दीनांचा, गुणी गुणांचा राजा दीनांचा
थाटण्या संसार साज
येणार बाई Barister साहेब माझ
(येणार बाई Barister साहेब माझ)

येणार बाई Barister साहेब माझ
(येणार बाई Barister साहेब माझ)
येणार बाई गं Barister साहेब माझ
(येणार बाई Barister साहेब माझ)
(येणार बाई Barister साहेब माझ)



Credits
Writer(s): Madhukar Pathak, Anand Shinde, Harshad Shinde, Dilraj Pawar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link