Chimb Pavasaan Raan Jhala

चिंब पावसानं रान झालं आबादानी

चिंब पावसानं रान झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली?
झाकू कशी पाठीवरली चांदण गोंदणी बाई?
बाई चांदण गोंदणी

झाकू नको कमळनबाई एकांताच्या कोनी
झाकू नको कमळनबाई एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, रुपखनी अंगावरली
सखे, लावण्याची खाणी, लावण्याची खाणी

चिंब पावसानं रान झालं आबादानी

राया, तुझे हात माझ्या हातात गुंफुनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी
राया, तुझे हात माझ्या हातात गुंफुनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी

लाज पांघरुनी, लाज पांघरुनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी

झाकू नको कमळनबाई, झाकू नको कमळनबाई
सखे, लावण्याची खाणी, लावण्याची खाणी
चिंब पावसानं रान झालं आबादानी

बोल, हैया, हैया, हैया, वाह रे, वाह! वागिनीया

तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी
पाण्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी
पाण्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी

आभाळ अस्मानी, आभाळ अस्मानी
पाण्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी

झाकू कशी पाठीवरली?
झाकू कशी पाठीवरली चांदण गोंदणी बाई?
बाई चांदण गोंदणी
चिंब पावसानं रान झालं आबादानी

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता ना येई काही, साजणा बोलांनी
अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता ना येई काही, साजणा बोलांनी

साजणा बोलांनी, साजणा बोलांनी
सांगता ना येई काही, साजणा बोलांनी

झाकू नको कमळनबाई, झाकू नको कमळनबाई
सखे, लावण्याची खाणी, लावण्याची खाणी

चिंब पावसानं रान झालं आबादानी
चिंब पावसानं रान झालं आबादानी



Credits
Writer(s): Traditional, Bhushan Dua
Lyrics powered by www.musixmatch.com

Link