Devoo Nako Hundaka

दैव हासले तुला तरी
तू गात रहा गाणी
गहिवर फुटला तरी
लोचनी आणू नको पाणी

देऊ नको हुंदका
वेड्या जिवा, देऊ नको हुंदका
देऊ नको हुंदका
वेड्या जिवा, देऊ नको हुंदका

दुःखाला भिवू नको, माघारी जाऊ नको
दुःखाला भिवू नको, माघारी जाऊ नको
शरणागतासारखा

वेड्या, देऊ नको हुंदका
देऊ नको हुंदका
वेड्या जिवा, देऊ नको हुंदका

कधी दैवाचे फासे सुलटे
दान हातात येई उलटे
कधी दैवाचे फासे सुलटे
दान हातात येई उलटे

तरी खेळास या...
तरी खेळास या तू होऊ नको पारखा

वेड्या, देऊ नको हुंदका
देऊ नको हुंदका
वेड्या जिवा, देऊ नको हुंदका

दुःख लपवून सागर जगतो
सुख उभे किनारी बघतो
दुःख लपवून सागर जगतो
सुख उभे किनारी बघतो

जरा भवती पहा...
जरा भवती पहा का निराश होसी उगा?

वेड्या, देऊ नको हुंदका
देऊ नको हुंदका
वेड्या जिवा, देऊ नको हुंदका
देऊ नको हुंदका



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Prabhakar Jog
Lyrics powered by www.musixmatch.com

Link