Jagnyala Pankh Futale

काळजाचं सूप झालं
आरश्याला रूप आलं
काळजाचं सूप झालं
आरश्याला रूप आलं
जगण्याला पंख फुटले
हे माझ्या जगण्याला पंख फुटले

रान सारं गाणं झालं
मेणावानी मन झालं
रान सारं गाणं झालं
मेणावानी मन झालं
जगण्याला पंख फुटले
हे माझ्या जगण्याला पंख फुटले

हे फुलासंग नाचताना, रंग सारे वाचताना
हे डोळ्यामंदी तूच साचली

पैंजणांच वाजनं हे, जीव घेई लाजनं हे
पापण्यांची फुलं नाचली

पाखरांशी बोलताना, वाऱ्यावरी चालताना
जगण्याला पंख फुटले
हे माझ्या जगण्याला पंख फुटले

अंग-अंग खेटताना, आभाळही भेटताना
नजरंला लाज वाटली

झुळझुळीचे सूर झाले, हातांचेच हार झाले
ओठांची ही कुपी भेटली

देह तडीपार झाला, ढगावरी स्वार झाला
जगण्याला पंख फुटले
हे माझ्या जगण्याला पंख फुटले



Credits
Writer(s): Pawar Vinayak, Abhiraj Harsshit
Lyrics powered by www.musixmatch.com

Link