Dolyat Punha

डोळ्यात पुन्हा अलवार खुणा
हलका-हलका तो रंग जुना
आभास हा श्वासामधला
छळतो तुला ही का सांग ना?

डोळ्यात पुन्हा अलवार खुणा
हलका-हलका तो रंग जुना
(तू दिलेल अखेरच फुल ते ही आता सुकलं होतं)
(चूक फक्त माझी नाही, थोडं तुझ ही चूकलं होतं)

होती कुणी लाजरी, माझ्या मनाची परी
भिरभिरणारी, खळखळणारी, वेडी, खुळी-बावरी
हाए, तिचे हासणे, नजरेतूनी बोलणे
ती दिसतांना, ती हसतांना नादावले चांदणे

तो श्वास तिचा, सहवास तिचा
विश्वास तिचा हा अजूनी मना
डोळ्यात पुन्हा अलवार खुणा
हलका-हलका तो रंग जुना

(चालता-चालता पाऊल जेव्हा)
(त्या वळणावर पडलं होतं)
(मिठीत होतो आपण दोघ)
(घडायचं ते घडलं होते)

बेभान केले कोणी त्या धुंदलेल्या क्षणी?
जग विसरावे, बेहोश व्हावे झाली अशी मोहिनी
ते ओठ ओठांवरी, ती आग ह्या अंतरी
बुडलो प्रवाही उरले ना काही दोन्ही किनाऱ्यांवरी

त्या पाऊस राती दरवळली माती
ती अनामिक नाती, तो गोड गुन्हा
डोळ्यात पुन्हा अलवार खुणा
(आता तरी तुला कळलं ना की मी तोच आहे)



Credits
Writer(s): Sameer Samant, Sachin Pilgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link