Tujha Dhyas

हे भास तुझे दिन-रात असे बेचैन जीवाला करती
हा छंद तुझा कि गंध, प्रिये, दरवळतो अवती-भवती
उधळून मला मी गातो, ये साद सुरांनी देतो

चाहूल तुझी कि फसवी वेडी आशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा

धुके पांघरूनी पहाटे-पहाटे
तुझी याद माझा जीव जाळते
सुटे भान सारे दिशा भूल होते
तुझा गंध जेव्हा सांज माळते

हवासा-हवासा तरी सोसवेना
तुझ्या आठवांचा ऋतू सरेना
आभास तुझा रिमझिमतो
हरवून मला मी जातो

चाहूल तुझी कि फसवी वेडी आशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा

कधी चिंब राती उगा भास होती
तुझ्या चेहऱ्याने चांद हासतो
कधी पावलांचा तुझ्या नाद येतो
जीवाला नव्याने वेड लावतो

कसे सावरावे? मनाला कळेना
उरी मेघ दाटे, परी ओघळेना
एकांत गुलाबी होतो
बहरून पुन्हा मी येतो

चाहूल तुझी कि फसवी वेडी आशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा

हे भास तुझे दिन-रात असे बेचैन जीवाला करती
हा छंद तुझा कि गंध, प्रिये, दरवळतो अवती-भवती
उधळून मला मी गातो, ये साद सुरांनी देतो

चाहूल तुझी कि फसवी वेडी आशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा



Credits
Writer(s): Guru Thakur
Lyrics powered by www.musixmatch.com

Link