Surya Ugavato Nabhat (From "Gadbad Ghotala")

सूर्य उगवतो नभात आणिक कमलिनी फुलते
रवी किरणांच्या रेशीम स्पर्शी
इंद्रधनु खुलते, इंद्रधनु खुलते
मला न कळते किमया सारी का अशी घडते?
एक अनोखे मोरपीस का?
गालावर फिरते, गालावर फिरते

वाऱ्यात सुगंधी धूप, हृदयात निनादे भूप
नयनात तरळते माझ्या मनमोहक मोहन रूप
या दाही दिशांच्या गोपी विणतात भरजरी गोफ
वेळूत वाजते वेणू, रासाला रंग अमाप

प्रेम दिवाणी मीरा मी तर, मन माझे झुरते
रवी किरणांच्या रेशीम स्पर्शी
इंद्रधनु खुलते, इंद्रधनु खुलते
मला न कळते किमया सारी का अशी घडते?
एक अनोखे मोरपीस का?
गालावर फिरते, गालावर फिरते

का ओढ जीवाला लागे, हे कसले रेशीम धागे?
हे कसले गीत दिवाणे या ऊरात होई जागे?
रे प्रीती म्हणती याला, हे लेणे जपण्याजोगे
प्रीतीची रीत निराळी ती आपुल्या रंगी रंगे

दुःख कुणाचे घेऊन कोणी सुख आपुले देते
एक अनोखे मोरपीस का?
गालावर फिरते, गालावर फिरते
सूर्य उगवतो नभात आणिक कमलिनी फुलते
रवी किरणांच्या रेशीम स्पर्शी
इंद्रधनु खुलते, इंद्रधनु खुलते



Credits
Writer(s): Suresh Kumar, Murlidhar Gode
Lyrics powered by www.musixmatch.com

Link