Prabhati Sur Nabhi Rangati

प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी म्हणती

प्रभाती

पानोपानी अमृत शिंपीत, उषा हासरी हसते धुंदीत

जागी होऊन फुले सुगंधित
जागी होऊन फुले सुगंधित तालावर डोलती
प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी म्हणती
प्रभाती

कृषीवलाची हाक ऐकूनी मोट धावते शेतामधूनी
कृषीवलाची हाक ऐकूनी मोट धावते शेतामधूनी
पक्षी अपुल्या मधूर स्वरांनी
पक्षी अपुल्या मधूर स्वरांनी स्वरांत स्वर मिळविती
प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी म्हणती
प्रभाती

प्रसन्न वदनी सुहासिनी कुणी सडे शिंपीती मृदुल करांनी

श्री विष्णुचे नाम स्मरुनी
श्री विष्णुचे नाम स्मरुनी तार कुणी छेडीती
प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी म्हणती
प्रभाती

Credits
Writer(s): Vasant Prabhu, Ramesh Anavkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link