Shrirang Sanvala Too

श्रीरंग सावळा तू, मी गौरकाय राधा
श्रीरंग सावळा तू, मी गौरकाय राधा
ही प्रीत दो जिवांची अद्वैत रे मुकुंदा
श्रीरंग सावळा तू, मी गौरकाय राधा

ये राधिके अशी ये होऊन प्रीति मुग्धा
ये राधिके अशी ये होऊन प्रीति मुग्धा
नयनांतुनी फुलू दे अपुल्या अमोल छंदा

श्रीरंग सावळा तू, मी गौरकाय राधा

ये प्रेमले अशी ये फुलवित सुप्रभाती
ये प्रेमले अशी ये फुलवित सुप्रभाती
प्रणयातल्या सुरांनी सजवीत सांजराती, सजवीत सांजराती
मिटल्या फुलापरी त्या तव नील लोचनांत
लावून भारलेली भावूक प्रीति ज्योत

श्रीरंग सावळा तू, मी गौरकाय राधा

का लोचनी प्रिया रे हृदयी तुझेच रूप?
का लोचनी प्रिया रे हृदयी तुझेच रूप?
दिन-रात लाविते मी येथे तुझाच दीप
गाते तुझेच गाणे, कथनी तुझे उखाणे
तुझियाकडेच धावे मनपाखरू दिवाने

ये राधिके अशी ये

येताच मी परंतु तुझिया समीप का गे
येताच मी परंतु तुझिया समीप का गे
होशी अबोल वेडी, विणीशी मनात धागे
विणीशी मनात धागे
त्या चित्त पाखराला लपवून ठेविशी का?
भारावुनी अशी या नेत्रांत पाहशी का?

श्रीरंग सावळा तू, मी गौरकाय राधा

ते बोलके अबोल क्षण सर्व आठवावे
ते बोलके अबोल क्षण सर्व आठवावे
मम लाजऱ्या दिठीत सारेच साठवावे
हा छंद या जिवाला जडवी तुझीच मूर्ती
मी मंगलातुनी या गुंफी अभंग नाती

ये राधिके अशी ये होऊन प्रीति मुग्धा
नयनांतुनी फुलू दे अपुल्या अमोल छंदा

श्रीरंग सावळा तू, ये राधिके अशी ये
श्रीरंग सावळा तू, ये राधिके अशी ये
श्रीरंग सावळा तू...



Credits
Writer(s): Anil Mohile, Shantaram Nandgaokar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link