Chand Talyat

चांद तळ्यात वाकून पाही
रात सरेना तशीच राही
सूर तुझे सुखावी जीवाला
प्रीत बावरी अबोल होई

चांद तळ्यात वाकून पाही
रात सरेना तशीच राही

सये, अशी तू हळूच येऊन
मग पुन्हा मला बिलगावे
हो, सूर काहीसे हळवे आतुर
माझ्यापाशी मागावे

पुसून जाईल मधले अंतर
उरले दोघा भानच नाही, भानच नाही
हात तुझा हा असावा हाती
नजर सांगते गहिरे काही, गहिरे काही, हो

चांद तळ्यात, चांद तळ्यात
चांद तळ्यात वाकून पाही
रात सरेना तशीच राही
सूर तुझे सुखावी जीवाला
प्रीत बावरी अबोल होई

शब्दांच्या पल्याड काही नजर सांगते तुझी
मालवून चंद्र जरासा लाजते मी अशी
हो, शब्दांच्या पल्याड काही नजर सांगते तुझी
मालवून चंद्र जरासा लाजते मी अशी

श्वासामधूनी वाहत राही चांदण्यातली
रात प्रवाही, रात प्रवाही, हो

चांद तळ्यात, चांद तळ्यात
चांद तळ्यात वाकून पाही
रात सरेना तशीच राही
सूर तुझे सुखावी जीवाला
प्रीत बावरी अबोल होई

वेडे रेशमी नाते कसे येई जुळून?
कधी होई पहाट आले नाही कळून
वेडे रेशमी नाते कसे येई जुळून?
कधी होई पहाट आले नाही कळून

रूप तुझे खुलून येई
प्रीत बावरी अबोल होई
अबोल होई, हो, अबोल होई



Credits
Writer(s): Nilesh Moharir, Ashwini C. Shende
Lyrics powered by www.musixmatch.com

Link