Ganpati Bappa Morya - From "Thartharaat"

गजानना रे तुला स्मरून
गजानना रे तुला स्मरून
आज जाहले सारे पावन
दे आम्हा वरदान
देवा, दे आम्हा वरदान रे

गणपती बाप्पा, अरे, गणपती बाप्पा मोरया
(गजानना श्री गणराया)
ए, गणपती बाप्पा मोरया
(गजानना श्री गणराया)

मोरया रे, बाप्पा मोरया रे
गजाननाचे नाम आता घेऊया रे

गणपती बाप्पा, अरे, गणपती बाप्पा मोरया
(गजानना श्री गणराया)
ए, गणपती बाप्पा मोरया
(गजानना श्री गणराया)

भक्तीनं रंगून, बेभान होऊन
करतो जय जयकार
(देवा तुझा करतो जय जयकार)
(नवसाला पावशी, हाकेला धावशी)
(महिमा अपरंपार, देवा तुझा महिमा अपरंपार)

अरे, देवांचा तू देव महान
देवांचा तू देव महान
सर्व संकटी नेशी तारून
गातो मी गुणगान, देवा गातो मी गुणगान रे

गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया
(गजानना श्री गणराया)
ए-ए, गणपती बाप्पा मोरया
(गजानना श्री गणराया)

युगे-युगे रे तुझा लाभला भक्तांना आधार
झाली आता गणेश कृपा, नाही मुळी माघार
(देवा नाही मुळी माघार)
ए, गजाननाच्या नामाचा हा होई रे ललकार

आज होऊ दे सर्वांचे रे स्वप्न गोड साकार
(देवा स्वप्न गोड साकार)
देवांचा तू देव महान, देवांचा तू देव महान
सर्व संकटी नेशी तारून
गातो मी गुणगान, देवा गातो मी गुणगान रे

गणपती बाप्पा, ए गणपती बाप्पा मोरया
(गजानना श्री गणराया)
ए-ए, गणपती बाप्पा मोरया
(गजानना श्री गणराया)

मोरया रे, बाप्पा मोरया रे
गजाननाचे नाम आता घेऊया रे

गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया
(गजानना श्री गणराया)
(गणपती बाप्पा मोरया)
(गजानना श्री गणराया)

(गणपती बाप्पा मोरया)
(गजानना श्री गणराया)
(गणपती बाप्पा मोरया)
(गजानना श्री गणराया)



Credits
Writer(s): Deepak Patekar, Pravin Davane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link