Bhaktachi Pandhari

भक्ताची पंढरी चंद्रभागेतीरी
भक्ताची पंढरी चंद्रभागेतीरी
उभा विटेवरी हरी, उभा विटेवरी
उभा विटेवरी हरी, उभा विटेवरी

भक्ताची पंढरी चंद्रभागेतीरी
भक्ताची पंढरी चंद्रभागेतीरी

आषाढीला जाती सारे सदा भक्तगण
आषाढीला जाती सारे सदा भक्तगण
भक्तिभावे पाहती तेथे उभा नारायण
भक्तिभावे पाहती तेथे उभा नारायण

आनंदे नाचती फक्त देवाचिया दारी
भक्ताची पंढरी चंद्रभागेतीरी
भक्ताची पंढरी चंद्रभागेतीरी

हाती वीणा आणि चिपळ्या, मुखी हरिनाम
हाती वीणा आणि चिपळ्या, मुखी हरिनाम
गोपाळांच्या संगे नाचे, नाचे घनश्याम
गोपाळांच्या संगे नाचे, नाचे घनश्याम

भक्तासाठी देव धावे पहा चक्रधारी
भक्ताची पंढरी चंद्रभागेतीरी
भक्ताची पंढरी चंद्रभागेतीरी

जीवनात राहो नित्य धर्म आचरण
जीवनात राहो नित्य धर्म आचरण
सर्वाभूती आत्मा एक तत्व हे महान
सर्वाभूती आत्मा एक तत्व हे महान

भक्तीसाठी जातो तेथे नित्य वारकरी
भक्ताची पंढरी चंद्रभागेतीरी
भक्ताची पंढरी चंद्रभागेतीरी

योग, कर्म आणि भक्ती साधने ही थोर
योग, कर्म आणि भक्ती साधने ही थोर
जन्म मानवाचा येथे आहे एकवार
जन्म मानवाचा येथे आहे एकवार

दत्ता म्हणे श्रीहरी माझा संकटे निवारी
भक्ताची पंढरी चंद्रभागेतीरी
भक्ताची पंढरी चंद्रभागेतीरी
उभा विटेवरी हरी, उभा विटेवरी
उभा विटेवरी हरी, उभा विटेवरी

भक्ताची पंढरी चंद्रभागेतीरी
भक्ताची पंढरी चंद्रभागेतीरी
भक्ताची पंढरी चंद्रभागेतीरी



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, Datta Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link