Jithe Sagra Dharni Milte

जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते
जिथे सागरा...

डोंगरदरीचे सोडून घर ते
पल्लव-पाचूचे तोडून नाते
डोंगरदरीचे सोडून घर ते
पल्लव-पाचूचे तोडून नाते

हर्षाचा जल्लोष करुनी जेथे
प्रीत नदीची एकरूपते
हो, तिथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते
जिथे सागरा...

वेचित वाळूत शंख-शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले
वेचित वाळूत शंख-शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले

खेळाचा उल्हास रंगात येऊनी
धुंदीत यौवन जिथे डोलते
हा, तिथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते
जिथे सागरा...

बघुनी नभीची चंद्रकोर ती
सागर हृदयी ऊर्मी उठती
बघुनी नभीची चंद्रकोर ती
सागर हृदयी ऊर्मी उठती

सुख-दुःखाची जेथे सारखी
प्रीत जीवना ओढ लागते
हा, तिथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते
जिथे सागरा...



Credits
Writer(s): Vasant Prabhu, P Savalaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link