Vikal Saajveli

विकल सांजवेळी डोळ्यात आले पाणी
विकल सांजवेळी डोळ्यात आले पाणी
फिरून आठवे रे चुकली प्रेमकहाणी
विकल सांजवेळी...

उदास होता वारा, उदास नदीकाठ
उदास होता वारा, उदास नदीकाठ
मुकेच झाले ओठ गिळून सारी गाणी
विकल सांजवेळी...

चुकले कुठे काही कळले कसे नाही
चुकले कुठे काही कळले कसे नाही
घेरल्या दिशा दाही अशुभ सावल्यांनी

विकल सांजवेळी डोळ्यात आले पाणी
फिरून आठवे रे चुकली प्रेमकहाणी
विकल सांजवेळी...



Credits
Writer(s): Shanta Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link